धार्मिक

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह प्रारंभ

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर हनुमान मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहास राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते प्रारंभ झाला याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार आदी उपस्थित होते

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह प्रारंभ

संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगांव:- तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सालाबादप्रमाणे याही वर्षी हनुमान मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहास नुकताच प्रारंभ झाला. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते या सप्ताहाचे दिप प्रज्वलन करण्यांत आले.याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, चीफ केमिस्ट विवेककुमार शुक्ला, चीफ इंजिनियर के. के. शाक्य, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, अॅडमिनीस्ट्रेटीव्ह मॅनेजर प्रकाश डुंबरे, सहायक मुख्य लेखापाल प्रविण टेमगर, रंगनाथ लोंढे यांच्यासह विविध खातेप्रमुख, उप खातेप्रमुख, कर्मचारी, भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.प. पू. रमेशगिरी महाराज याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, माउली ज्ञानेश्वरासह सर्व भावडांनी शेजारच्या पुणतांबा येथील चांगदेवांना ज्ञानाची प्रचिती दाखविलेली आहे. ज्ञानचा इश्वर या नामस्मरणातच विश्वकल्याणासह तुमचा आमचा भाग्योदय आहे. संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी तालुक्याच्या विकासाबरोबरच अध्यात्मीक क्षेत्रात मोठे योगदान दिले असुन त्यांचा वारसा पुढची पिढी बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्यांचे युवा अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे हे सक्षमपणे पुढे चालवित आहे. स्वामी सहजानंदभारती यांच्या आर्शिवादाने स्व. शंकरराव कोल्हे यांनी या परिसराचा कायापालट केला आहे. कोपरगांव तालुक्याला महान ऐतिहासिक वारसा लाभलेला असुन गोदाकाठी असंख्य संत महंतांनी तपश्चर्या केली असुन त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमि पवित्र आहे. संजीवनी उद्योग समुहाच्या माध्यमांतून असंख्य गोर गरीबांचे संसार प्रपंच फुललेले आहेत. तीर्थक्षेत्र कोकमठाण येथे नुकताच ऐतिहासिक १७५ वा गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह पार पडला हे देखील कोपरगांव तालुकावासियांचे मोठे भाग्य आहे. शेवटी अॅडमिनीस्ट्रेटीव्ह मॅनेजर प्रकाश डुंबरे यांनी आभार मानले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे