धार्मिक

श्री क्षेत्र माणिकेश्वर अडबंगीनाथ श्री गोरक्षनाथ मंदिर धामोरी येथे धर्मनाथ बीज व नवनाथ पारायण सोहळ्याचे आयोजन

 

श्री क्षेत्र माणिकेश्वर अडबंगीनाथ श्री गोरक्षनाथ मंदिर धामोरी येथे धर्मनाथ बीज व नवनाथ पारायण सोहळ्याचे आयोजन

संपादक रवींद्र जगताप

श्री चैतन्य गोरक्षनाथाचे कृपेने श्री संत सद्गुरू जनार्दन स्वामी श्री संत सद्गुरू जंगलीदास महाराज व श्री संत शिवदास गिरीजी महाराज करंजी श्री संत स्वामी गोविंद भारती परमपूज्य सद्गुरु श्री सिद्धरुढ स्वामी परमपूज्य सद्गुरू आचार्य शिवकुमार स्वामीजी मठाधिपती आश्रम सिद्धरुढ मढ बिदर कर्नाटक यांच्या कृपा आर्शिवादाने मौजे धामोरी येथे सालाबाद प्रमाणे धर्मनाथ बीज व नवनाथ पारायण सोहळ्याचे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमासाठी परमपूज्य सद्गुरु रमेश गिरीजी महाराज मठाधिपती राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम सद्गुरु रामगिरीजी महाराज मठाधिपती सरला बेट परमपूज्य महामंडलेश्वर 1008 संत श्री दत्तगुरुजी महाराज वैजापूर शारदानंद माई पोहेगाव संत श्री गणेश गिरीजी महाराज निफाड परमपूज्य संत श्रीविष्णु गिरीजी महाराज शिवरे परमपूज्य संत श्री रामप्रभू महाराज अंजनापुर परमपूज्य सद्गुरु संत श्री ज्ञानानंद गिरीजी महाराज वैजापूर संत श्री मदन महाराज ठाणे परमपूज्य संत श्री दत्तानंदगिरी महाराज टाकेद घोटी परमपूज्य महामंडलेश्वर 1008 शिवानिजी माई उंदीर वाडी ,संत श्री विकास गिरीजी महाराज मायगाव देवी, परमपूज्य संत श्री चंद्रशेखरनाथ महाराज अधिष्ठान धामोरी आदि संत महंत हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहे

जाहिरात

श्री माणकेश्वर अडबंगीनाथ यांच्या कृपाशिवादाने व साधुसंताच्या उपस्थित अडबंगीनाथ ही श्री नवनाथ सांप्रदायाचे आदीपीठ असून अडबंगी नाथांची जन्मभूमी तपोभूमी व दीक्षाभूमी आहे नवनाथ ग्रंथांमध्ये अध्याय 33 वा ओवी क्रमांक 63 मध्ये दर्शविल्याप्रमाणे श्री गोरक्ष नाथांनी श्री अडभंगीनाथांना  दीक्षा देऊन आपल्या पदस्पर्शाने हे स्थान पुनीत केले आहे या जागेवर नऊ विराट फांद्यांचे पूज्य वृक्ष हे गोरख चिंच म्हणून प्रख्यात आहे अत्यंत प्राचीन आयुर्वेदिक शास्त्र आधारित सदस्य गोरख चिंचेचे पाने व फळे व साले बहुरोग नाशक म्हणून प्रसिद्ध असून भाविकांना त्याचा लाभ मिळतो शनिवार दिनांक ३/२/२०२४  रोजी सकाळी ९:०० वाजता श्री नवनाथ पारायणाचे प्रारंभ होणार असून श्रद्धेयस्वामी श्री दीनानाथ महाराज ऋषिकेश महामंत्री अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश, परमपूज्य संत श्री विकासगिरी महाराज मायगाव देवी व परमपूज्य संत श्री चंद्रशेखर नाथ महाराज अधिष्ठान धामोरी यांच्या शुभहस्ते नवनाथ पारायणास प्रारंभ होणार आहे तसेच दिनांक 3 फेब्रुवारी 2024 ते रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी दररोज श्री नवनाथ ग्रंथाचे पारायण होणार आहे त्याचबरोबर शुक्रवार दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी शनिदेव अभिषेक.  अँड राजेंद्र बदामे शनिभक्त यांच्या हस्ते होणार आहे त्यानंतर पाच वाजता ह भ प श्री मधुकर महाराज गडाख धामोरी यांचे प्रवचन होणार आहे शनिवारी  १० फेब्रुवारी दुपारी ४ ते ५ वाजता परमपूज्य संत श्री दत्त गिरीजी महाराज टाकेद घोटी यांचं प्रवचन होणार आहे रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी साडेसात वाजता श्री नवनाथ ग्रंथ पूजन परम पूज्य दत्तगिरी जी महाराज वैजापूर सकाळी ८ ते ९ वाजता भिक्षा फेरी व श्री नवनाथ पालखी मिरवणूक कलश पूजन  खासदार  सुजय दादा विखे  खासदार सदाशिवराव लोखंडे  आमदार आशुतोष दादा काळे युवा  नेते विवेक भैय्या कोल्हे मनेश गाडे सुधाकर दंडवते दत्तात्रय पाटील यांचे शुभे हस्ते होणार आहे सकाळी १० वाजता परमपूज्य बापू शिवाजी महाराज भालुरकर यांचे धर्मनाथ बीज निमित्त किर्तन होणार आहे परमपूज्य रमेश गिरीजी महाराज परमपूज्य संत श्री दत्तगुरुजी महाराज वैजापूर यांचा अमृत संदेश व महाआरती होवुुन महाप्रसाद होणार आहे या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन  विजय त्र्यंबकराव जाधव यांनी केले आहे.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय त्र्यंबकराव जाधव विमल बोरसे बाबासाहेब कारभारी मांजरे विद्याताई दत्तात्रय पाटील, विजयमाला बाजीराव खैरनार विश्वास त्रंबकराव जाधव विलाजी बाजीराव कदम ,बाळकृष्ण एकनाथ मांजरे ,विश्वावती  काळे, रागिनी देशमुख, राधिका पाटील ,ऐश्वर्या दिज्ञे गोरक्ष बोरसे राहुल जाधव अभिजीत जाधव चैतन कदम गोरक्षनाथ सेवा मंडळ श्री स्वामी समर्थ सेवेकरी जाणता राजा, एवन आनंदवली मित्र मंडळ अडबंगीनाथ दिंडी मंडळ न्यू इंग्लिश स्कूल धामोरी सर्व ग्रामस्थ पंचक्रोशी भजनी मंडळ प्राचार्य शिक्षक  शिक्षकेत्तर सेवक रुंद  सर्व विद्यार्थी के.बी. रोहमारे कॉलेज चाासनळी आदी परिश्रम घेत आहे.श्री क्षेत्र माणिकेश्वर अडबंगीनाथ श्री गोरक्षनाथ मंदिर धामोरी या ठिकाणी सदरचा कार्यक्रम होणार आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे