एस.टी.महामंडळ प्रवास भाडे सवलत
संपादकीय
एस.टी.महामंडळ प्रवास भाडे सवलत
एसटी महामंडळाच्या प्रवास.भाड्यात 50% महिलांना सवलत, नुकताच महाराष्ट्र शासनाने महिलांना 50 टक्के तिकीट दरामध्ये सवलत दिली आहे ही सवलत दिल्यामुळे महिला वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे खरोखरच हा निर्णय चांगला असला तरी याचा फायदा मोठ्या प्रमाणात जनतेला होणार आहे सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असून एसटी प्रवास भाड्यामध्ये महिलांना 50 टक्के सवलत दिल्यामुळे याचा फायदा महिला वर्गाला झाला आहे सध्या लग्नसराई असल्यामुळे याचा फायदा आणखीनच गोरगरीब नागरिकांना देखील होणार आहे. शासनाने 50% सवलत दिल्यामुळे त्यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे शासन कुठलेही असो गोरगरिबांना न्याय देण्यासाठी शासन नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये महागाई वाढली आहे गॅस टाकीचे भाव वाढले आहे .पेट्रोल डिझेलचे मोठ्या प्रमाणात भाव वाढलेले आहे त्यामुळे सर्व सामान्य माणसाला जगणे मुश्किल झाले आहे. जनतेचे आरोग्य त्याच बरोबर सर्व जनतेला असलेल्या सेवा देण्याचे काम , मूलभूत ज्या सेवा आहे त्या देण्याचे काम शासनाचे असते भारतीय संविधानानुसार देशातील जनतेला सेवा पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सध्या महिलांना जो 50% प्रवासासाठी जी सूट दिली आहे या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसांपूर्वी एसटी महामंडाळाचे एक मोठे आंदोलन झाले. या आंदोलन कर्त्याची प्रमुख मागणी होती की एसटी महामंडळाचे सरकारीकरण करावे हे आंदोलन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात झाले. त्याला कायदेशीर लढाई देखील करण्यात आली. त्यावेळेस तत्कालीन शासनाने मात्र एसटी महामंडळाचे सरकारीकरण करता येणार नाही कारण एस टी महामंडळ तोट्यात आहे एस टी महामंडळ चालविण्यासाठी मोठा खर्च येत असतो त्यामुळे एसटी महामंडळाचे खाजगीकरण करता येणार नाही आता प्रश्न असा आहे की, जे आता महिलांना 50 टक्के सवलत दिली आहे त्यामुळे एसटी महामंडळ तोट्यात जाणार की फायद्यात जाणार हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.मुळातच शासन जनतेला सेवा देतांना आर्थिक फायदा किंवा तोट्याचा विचार करु शकत नाही. कारण शासन काय कंपनी नाही.तरीसुद्धा अनेक विभाग तोट्यात चालत आहे.म्हणुन खाजगीकरण होत आहे. शासनाने मात्र निवडणुकीच्या जवळ आल्यानंतर अशा योजना आणतात असं चित्र नेहमीप्रमाणे दिसत असतं महिलांना 50% व 65 वर्षावरील नागरिकांना पूर्णपणे मोफत प्रवास सवलत करण्यात आला आहे या दोन्ही योजना सामान्य माणसाला आनंददायी आहे अशा योजना जास्तीत जास्त शासनाने करायला हव्या यात काही दुमत नाही परंतु या योजना निवडणुकी डोळ्यासमोर ठेवूनच केल्या जातात तूर्तास च्या दोन्ही योजनांमुळे नागरिकांना फायदा होत असून या योजनेचे सामान्य नागरिक म्हणून स्वागत च आहे.
लेखन :- रविंद्र जगताप

