राजकिय

शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढवावी :- नितिन शिंदे

शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढवावी :- नितिन शिंदे
संपादक :- रविंद्र जगताप
नुकतीच दिनांक २/६/२३  शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा बैठक प्रदेश काँग्रेस कार्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये टिळक भवन दादर, मुंबईत घेण्यात आली. शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेसनेच लढवली पाहिजे.पक्षाच्या टिळक भवन येथील प्रदेश कार्यालयात लोकसभेची आढावा बैठक पार पडली. यावेळी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री अमित देशमुख, सतेज उर्फ बंटी पाटील, कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, माजी मंत्री नसीम खान डॉ. राजीव वाघमारे आदींसह प्रमुख नेते उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांसमोर तशी श्री नितीन राव शिंदे यांनी आग्रही मागणी केली आहे.शिर्डी मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी शिर्डी मतदारसंघ हा काँग्रेसचाच आहे. ठाकरे सेनेचे निवडून आलेले खासदार शिंदे सेनेत गेले आहेत. त्यामुळे सेनेकडे स्थानिक सक्षम उमेदवार नाही. उत्तरेत सहापैकी पाच आमदार हे महाविकास आघाडीचे आहेत. काँग्रेसने ही जागा लढवलीच पाहिजे. शिवसेनेकडे स्थानिक उमेदवार नसल्यामुळे आयात उमेदवारासाठी हा मतदारसंघ काँग्रेसने कदापिही सोडू नये, अशी आग्रही मागणी यावेळी  नितीन राव शिंदे, विजय जाधव चंद्रकांत बागुल चंद्रहार जगताप यांच्या सह कार्यकर्त्यांनी केली.
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे