आरोग्य व शिक्षण

आर जे एस फार्मसी महाविदयालयात लाईफ स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

आर जे एस फार्मसी महाविदयालयात लाईफ स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी:-कोकमठाण येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन संचलित कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२३ ते ०१ सप्टेंबर २०२३ या दरम्यान रूबिकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूतर्फे लाईफ स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विदयार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास तसेच, वेळेचे नियोजन, किमान कौशल्य, लेखन कौशल्य, संवाद तंत्र, मुलाखत तंत्र याविषयी जागरूकता करून ते विदयार्थ्यांमध्ये विकसित करण्यावर कार्यशाळेत भर देण्यात आला. कार्यशाळा ही तृतीय व चतुर्थ वर्षातील बी. फार्मसी विद्यार्थ्यांसाठी त्यांचा सर्वांगिण विकास होऊन, रोजगार क्षमतेत वाढ होण्याच्या हेतुने चार दिवस प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.
जाहिरात
रूबिकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट तर्फे प्रशिक्षक म्हणून मुष्किम सय्यद, कोमल नगरे व स्नेहल नगरे यांनी कार्यशाळेत विदयार्थ्यांना लाईक स्किल्स, सॉफ्ट स्किल, कम्युनिकेशन स्किल, इंटरव्यू व प्रेसेंटेशन स्किल प्रात्यक्षिक स्वरूपात शिकविले. प्रशिक्षण कार्यशाळेत शिष्टाचार आणि लेखनातील संवादाच्या योग्य टोनसह ईमेल लेखनाच्या कलेची ओळख करून देण्यात आली.
जाहिरात
कार्यशाळेत शेवटच्या दिवसाची सुरुवात मनोरंजन मेंदू प्रशिक्षण उपक्रमांनी झाली.विदयार्थ्यांना अभ्यासक्रमा बरोबर इतर गुण व कौशल्य विकसित व्हावेत, यासाठी आर जे एस फाऊंडेशन नेहमीच प्रयत्नशिल असते. अशा प्रशिक्षणामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्यांचा करिअरकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. त्यासाठी मुलांनी जास्तीत जास्त उपक्रमांमध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. नितिन जैन यांनी केले. आभारप्रदर्शन कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे, सचिव प्रसाद कातकडे, दिपक कोटामे, प्रसिद्ध उद्योजक ज्ञानेश्वर सिनगर व विजयजी कडू यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विदयार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. नितिन जैन यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले ट्रेनिंग अंक प्लेसमेंट विभागाचे प्रा. एस जी.लावरे यांनी कार्यकार्यशाळा योग्य पद्धतीने व नियोजनबद्ध चालविली.प्रा. कविरी चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. तसेच कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रा.विजय जाधव, प्रा. करवीर आघाडे, प्रा.सचिन आगलावे, प्रा.सुरज बेंद्रे, प्रा. उत्कर्षा लासुरे व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे