आरोग्य व शिक्षण

रुबी हॉल पुणे हॉस्पिटल मध्ये काम करण्यास आर जे एस नर्सिंग कॉलेजचे ३६ विद्यार्थी पात्र

आर जे एस नर्सिंग कॉलेजमध्ये मुलाखत दिलेले विद्यार्थी व रुबी हॉस्पिटलचे अधिकारी दिसत आहे.
रुबी हॉल पुणे हॉस्पिटल मध्ये काम करण्यास आर जे एस नर्सिंग कॉलेजचे ३६ विद्यार्थी पात्र
३६ पैकी ३६ विद्यार्थी पात्र झाल्याने कोपरगावात विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव : – कोपरगाव तालुक्यातील २६ ऑगस्ट रोजी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाऊंडेशन नर्सिंग कॉलेजच्या B.Sc नर्सिंगच्या शेवटच्या वर्षाच्या ३६ विद्यार्थ्यांची पुणे येथील रुबी हॉल हॉस्पिटलच्या सिनिअर मॅनेजर मृणल उजागरे,उप अधीक्षक मोहम्मद सदामुद्दीन,सहाय्यक अधीक्षक विन्नारसी सेलवम, शिक्षक परिचारिका श्रद्धा दळवी,या अधिकाऱ्यांनी आर जे एस नर्सिंग कॉलेज मध्ये मुलाखत घेतली होती.२ सप्टेंबर शनिवार रोजी रुबी हॉल हॉस्पिटल पुणे यांच्या अधिकृत ईमेलद्वारे ३६ पैकी ३६ विद्यार्थ्यांची निवड केल्याचे कळवले आहे.
जाहिरात
आर जे एस नर्सिंग कॉलेजची स्थापना २०१९ रोजी झाली असून अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण मिळत असल्याने महाराष्ट्रातील विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहे.आर जे एस नर्सिंग कॉलेजमध्ये B.SC नर्सिंग,G N M नर्सिंग,A N M नर्सिंग,पोस्ट बेसिक B.SC नर्सिंग हे महत्वपूर्ण कोर्सेस उपलब्ध आहेत.आणि आर जे एस नर्सिंग कॉलेज कोपरगाव येथे विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षणाबद्दल भरभरून कौतुक आणि समाधान व्यक्त केले.आता कोपरगाव येथे आर जे एस नर्सिंग कॉलेजमध्ये शिकलेले विद्यार्थी पुणे येथील सुप्रसिद्ध रुबी हॉल हॉस्पिटल मध्ये काम करणार याचा आनंद संस्थेतील प्राचार्य सर्व शिक्षक सर्व कर्मचारी व सर्व पालक व्यक्त करत आहेत. संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे, सचिव प्रसाद कातकडे, डॉ.पूजा कातकडे, विजय कडू,दीपक कोटमे आणि मॅनेजमेंटच्या वतीने नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.इरशाद अली,उप प्राचार्य डॉ.सुरेश जिल्स व सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले, पुढील काळातही आपली संस्था दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत असे मत व्यक्त केले.
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे