संपादकीय

एका पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय पक्षाचा शहर प्रमुख आणि पालिकेचा एक अधिकारी गळ्यात टाळ घालुन आणि ढोलचा गजर करतात तो क्षण….

एका पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय पक्षाचा शहर प्रमुख आणि पालिकेचा एक अधिकारी गळ्यात टाळ घालुन आणि ढोलचा गजर करतात तो क्षण....

संपादक:- रवींद्र जगताप

कोपरगाव शहरामध्ये आठवड्या पुर्वी गणपती विसर्जन मोठ्या आनंदात भक्तिभावाने संपन्न झाले. अनेक मंडळांनी पारंपारिक वाद्य वाजवत लाडक्या गणरायाला निरोप दिला आहे शहरांमधील विविध मंडळांनी वेशभूषा धारण करून डी.जे.च्या तालावर त्याचबरोबर ढोल ताशाच्या गजरांमध्ये विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडल्या आहे कोपरगाव शहरामध्ये गणेश उत्सव दर वर्षी मोठ्या भक्ती भावाने पार पडला जात असतो शहरातील अनेक मंडळे गणेश विसर्जन मिरवणुकीला गणेश विसर्जन करत असतात शहरांमध्ये नवव्या दिवसांपासूनच गणेश विसर्जनाला सुरुवात झाली होती कोपरगाव शहरांमधील गुरुद्वारा रोड विघ्नेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक गांधी चौक या मार्गावरून गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होत्या . कोपरगाव शहरामध्ये अत्यंत शांततेत मोठ्या उत्साहात आनंदात भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा झाला आहे या गणेश उत्सवामध्ये अधिकारी वर्ग देखील भक्तिमय वातावरणात रमुन गेला होता पोलीस उपअधीक्षक मिटके साहेब त्याचबरोबर नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी गळ्यात टाळ घालून त्यांच्या जोडीला शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख कलविंदर सिंग दडियाल यांनी ढोल गळ्यात घालून या सर्वांनी ढोल आणि टाळचा गजर करत भक्तीमय वातावरण निर्माण केले होते हा क्षण आमच्या सत्य एक्सप्रेस न्युजने टिपला आहे स.न 2023 चा हा आनंदमय क्षण वाचकांसाठी आम्ही प्रकाशित करत आहोत.

लेखन :- रवींद्र जगताप,संपादक सत्य एक्सप्रेस
जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे