घर तेथे गॅस आला परंतु या गॅस मुळे घर तेथे खिश्याला झळ
संपादकीय
घर तेथे गॅस आला परंतु या गॅस मुळे घर तेथे खिश्याला झळ
गँस सिलेंडर ने १५ दिवसात दिला दोनदा झटका
गॅस सिलेंडर जीवानश्यक बनला आहे.घर तिथे चुल हि संकल्पना मोडत निघाली आहे.चुली नंतर स्टोव्हने बाजारात अनेक वर्षे राज्य केले.यासाठी राँकेल साठी नागरिकांना रांगेत तासांनतास बसावे लागत असत.त्याला पर्याय गॅस आला.सुरूवातीला ग्रामीण भागातील नागरिक गॅस घेण्यासाठी उत्सुक नसत. कालातरांने जनजागृती होवुन घर तेथे गॅस आला.घर तेथे गॅस आला परंतु या गॅस मुळे घर तेथे खिश्याला झळ असे नवीन समीकरण निर्माण झाले आहे गॅस सिलिंडरच्या दरात वाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा घरगुती सिलिंडरच्या दरात साडेतीन रुपयांची वाढ करण्यात आली असून, व्यवसायिक सिलिंडर देखील आठ रुपयांनी महागला आहे. यापूर्वी सात मे रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली होती. गेल्या 15 दिवसांमधील आज करण्यात आलेली ही दुसरी दरवाढ आहे. त्यापूर्वी एक मे रोजी व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली होती. आज व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर देखील वाढवण्यात आले आहेत.महागाई गेल्या 9 वर्षातील उच्चस्थरावर पोहोचली आहे. तर दुसरीकडे आता गॅस दरवाढीने देखील सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे.घरगुती गॅस दरवाढ हि याच पंधरा दिवसात दोनदा झाली आहे. आता गॅस सिलिंडर घेण्यासाठी तब्बल एक हजार रुपयांपेक्षाही अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. याचा परिणाम हा सर्वसामांन्यांच्या बजेटवर होण्याची शक्यता आहे.
लेखन – रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युज

