भारत जोडो यात्रा काँग्रेसच्या पुर्नजीवनाची सुरुवात
भारत जोडो यात्रा काँग्रेसच्या पुर्नजीवनाची सुरुवात
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर पर्यत भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांशी संवाद साधत आहे.७ सप्टेंबर २०२२ पासून या यात्रेला राहुल गांधी यांनी कन्याकुमारी पासुन सुरुवात केली होती.गेल्या काही वर्षात काँग्रेसला खुपच मरगळ आली आहे.२००९ ,२०१४ च्या लोकसभा, विधानसभा निवडणूकात काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता.त्यानंतर वारवार काँग्रेस माघाडीवर पडत होती.अनेक नेते भाजपात गेले.त्यामुळे काँग्रेस माघाडीवर पडत गेली.काँग्रेसने ७० वर्षे सत्ता भोगली.भारताच्या स्वातंत्र्यासाठी स्वतंत्र पूर्व काळात आझादी मिळविण्यासाठी क्रांती झाली.देशभक्तीची विचारधारा प्रत्येक नागरिकांच्या मनमनात होती.त्यामुळे काँग्रेस सत्तेत आली. परंतु ७० वर्षानंतर हि परिस्थिती राहिली नाही.याउलट भाजपाला एकेकाळी या पक्षाला उमेदवार मिळत नसत , आज त्या पक्षात नंबर लावुनही उमेवारी मिळत नाही.याचे कारण शोधले असता भाजपा व .राष्ट्रीय स्वयं संघाने हिदुत्वाच्या विचारधारेवर निरंतर काम करत राहिले.आजही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सत्तेत असूनही संघाचे कामकाज कँडेर कार्यक्रम चालूच आहे.हिदुत्वाची विचारधारा तरुणांमध्ये जागृत करुन त्यांना एकसंघ करण्यासाठी संघ यशस्वी झाला आहे.याचे भाजपाला फायदा होवुन भाजपा सत्तेत येतो.कारण भाजपा हा हिदुत्ववादी पक्ष आहे.गेल्या ७० वर्षात काँग्रेसने सत्ता मिळविली.जनतेची कामेही केली.परंतु व्होट बँक बनविण्यात अपयशी ठरले.तसेच नागरिकांमध्ये तरुणांमध्ये काँग्रेसची विचारधारा पेरण्यास अपयशी ठरले. आज मात्र भारत जोडो यात्रेला सुरुवात करुन राहुल गांधी यांना या यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळत असुन अनेक तरुण तरुणी या यात्रेस प्रतिसाद देत आहे.देशभरात तरुण मतदार देशाची राजकारणाची दिशा ठरवत असतात.या यात्रेला विविध राज्यात तरणांनी प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे भारत जोडो यात्रा काँग्रेसच्या पुर्नजीवनाची सुरुवात असे म्हणता येईल.या यात्रेचे २०२४ ला काँग्रेसला नक्कीच फायदा होईल.त्याच बरोबर काँग्रेसचे नविन अध्यक्षपदी मलिल्काअर्जुन खर्गे यांची नियुक्ती झाली. खर्गे अभ्यासू अनुभवी व्यक्तीमत्व असुन याचा काँग्रेसला येणार्या काळात फायदा होईल.भारत जोडो यात्रा सारखे निरंतर कार्यक्रमांचे आयोजन केल्यास २०२४ किंवा २०२९ च्या निवडणुकांत वेगळे चित्र पहावयास मिळेल
लेखन:- रविंद्र जगताप,संपादक
