संपादकीय

सारा गाव गणपती विसर्जन करीत होता तो मात्र आपल्या पोटाची खळगी भरत होता

सारा गाव गणपती विसर्जन करीत होता तो मात्र आपल्या पोटाची खळगी भरत होता

संपादक :- रवींद्र जगताप

कोपरगाव शहरामध्ये गुरुवारी गणपती विसर्जन मोठ्या आनंदात भक्तिभावाने संपन्न झाले अनेक मंडळांनी पारंपारिक वाद्य वाजवत लाडक्या गणरायाला निरोप दिला आहे शहरांमधील विविध मंडळांनी वेशभूषा धारण करून डी.जे.च्या तालावर त्याचबरोबर ढोल ताशाच्या गजरांमध्ये विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडल्या आहे कोपरगाव शहरामध्ये गणेश उत्सव दर वर्षी मोठ्या भक्ती भावाने पार पडला जात असतो शहरातील अनेक मंडळे गणेश विसर्जन मिरवणुकीला गणेश विसर्जन करत असतात शहरांमध्ये नवव्या दिवसांपासूनच गणेश विसर्जनाला सुरुवात झाली होती कोपरगाव शहरांमधील गुरुद्वारा रोड विघ्नेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक गांधी चौक या मार्गावरून गणपती विसर्जन मिरवणूक सुरू होत्या या विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक ठिकाणी नाष्टासाठी वडापाव ब्रेड वडे नाष्टा भाजलेले कंणसे असे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ विक्री साठी उपलब्ध होते त्या बरोबर जोडीला तहान भागवण्यासाठी पाण्याच्या बाटल्या देखील मोठ्या प्रमाणात अनेक दुकानावर विक्रीसाठी उपलब्ध होत्या या रोडवर मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांनी गर्दी केली होती त्यामुळे सहाजिकच पाण्याच्या बाटल्या देखील मोठ्या प्रमाणात विकल्या गेल्या नागरिकांनी या पाण्याच्या पाटल्या पाणी पिऊन झाल्यानंतर रोडच्या साईटला टाकल्या परंतु या टाकाऊ असलेल्या बाटल्या पासून अनेक नागरिक गोरगरीब असलेले आपली पोटाची खळगी भरत होते ह्या बाटल्या गोळ्या करून भंगार मध्ये विकणाऱ्या ह्या गोरगरिबांना रोजगार मिळाला आणि कळत नकळत देखील सुद्धा कोपरगाव शहरांमध्ये त्यांच्या हातुन स्वच्छता ठेवण्यास मदत होत होती कोपरगाव शहरांमधील नागरिक गणेश विसर्जन करत असताना तो मात्र आपली पोटाची खळगी भरण्यासाठी रोडवरील त्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून आपला उदारनिर्वाह करत होता सदरचा फोटो कॅमेरा मधून फोटोग्राफर हेमचंद्र भवर यांनी टिपला आहे.

लेखन रवींद्र जगताप ,संपादक सत्य एक्सप्रेस

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे